
रत्नागिरी, 6 नोव्हेंबर, (हिं. स.) : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे १३ शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी टीचर एक्स्लन्स अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या विलक्षण कार्याबद्दल, पोलिस उपनिरीक्षक कार्याबद्दल पोलिस उपनिरीक्षक अभय तेली यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे सर्व १३ शिक्षक विविध क्षेत्रातील असून, २५ वर्षांचे निःशुल्क योग प्रशिक्षक ते ७० वर्षांचे अनाथ मुलांच्या शाळेतील शिक्षक तसेच विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक अशा विविध क्षेत्रात काम करणारे आहेत.
टीचर एक्स्लन्स अॅवॉर्डमध्ये प्रतिभा लोंढे, संदेश पालये, प्राजक्ता कदम, दूर्वांकुर चाळके, डॉ. महेंद्र गुजर, अपर्णा गोगटे, डॉ. विनोद शिंदे, डॉ. केतनकुमार चौधरी, दीपक नागवेकर, वासुदेव केळकर, आर्वी पाटील, सुनील शिंदे, अभय तेली यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी