एस.टी. बसच्या कटमुळे अपघात; ठाण्यातील नागरिकाचा मृत्यू
ठाणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। कोळीवाडाजवळील सलीम मटन दुकानासमोर झालेल्या अपघातात 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. नागोठणेहून येणा-या मोटारसायकलला समोरून आलेल्या एस.टी. बसने कट मारल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील चंदनवा
ठाणे


ठाणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। कोळीवाडाजवळील सलीम मटन दुकानासमोर झालेल्या अपघातात 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. नागोठणेहून येणा-या मोटारसायकलला समोरून आलेल्या एस.टी. बसने कट मारल्याने हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील चंदनवाडी येथील सरोवरदर्शन सोसायटीत राहणारे शांताराम दामा गायकवाड (वय 72, रा. चंदनवाडी ठाणे) हे एम.एच. 06 सी.ए. 4149 या मोटारसायकलच्या मागे बसून नागोठणेकडे येत होते. दरम्यान, नागोठणे बाजूकडून रिलायन्स चौकाकडे जाणारी पालीपेण एस.टी. बस (क्र. एम.एच. 20 बी.एल. 3239) कोळीवाडाजवळील सलीम मटन दुकानासमोर आली असता मोटारसायकलला कट मारल्याने गायकवाड खाली पडले.

अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान ठाण्यातील निवासस्थानी त्यांचा मृतदेह आणण्यात आला. यावेळी चंदनवाडी परिसरात शोककळा पसरली. या अपघात प्रकरणाची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहा. पो.नि. सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार महेश रूईकर पुढील तपास करीत आहेत. चंदनवाडी परिसरात परिचित असलेले शांताराम गायकवाड चंदनवाडी शिवसेना शाखेतही कार्यरत होते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा. चंदनवाडीत तुळशी विवाह आणि होळीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात शांताराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असे. समाजप्रिय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा वारसा जपणारे व्यक्तीमत्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande