सिंहगड रस्त्यावर नागरिकांच्या तक्रारींनंतर वाहतूक पोलिसांची मोहीम
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सिंहगड रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार ठरत असलेल्या काही रिक्षा चालकांवर सिंहगड वाहतूक पोलिस विभागाने धडक कारवाई केली आहे. हिंगणे, धायरी फाटा, नवले पूल, वडगाव बुद्रुक, आनंदनगर आणि माणिकबाग परिसरात ही कारवाई क
सिंहगड रस्त्यावर नागरिकांच्या तक्रारींनंतर वाहतूक पोलिसांची मोहीम


पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

सिंहगड रस्त्यावर वाढत्या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार ठरत असलेल्या काही रिक्षा चालकांवर सिंहगड वाहतूक पोलिस विभागाने धडक कारवाई केली आहे. हिंगणे, धायरी फाटा, नवले पूल, वडगाव बुद्रुक, आनंदनगर आणि माणिकबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींनंतर ही मोहीम राबवण्यात आली असून नियमभंग करणाऱ्या अनेक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतुकीत अडथळा निर्माण करणारे प्रकार जसे की रस्त्याच्या मध्यभागी थांबून प्रवासी घेणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, मीटर न लावणे, ठराविक स्टँडच्या बाहेर प्रवासी घेणे, नो-एंट्रीत प्रवेश करणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, सिग्नल तोडणे तसेच विनापरवाना वाहन चालवणे अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.सिंहगड रोड वाहतूक विभाग अंतर्गत जड वाहतूक, ऑटो रिक्षा आणि ट्रॅव्हल्स खासगी बसेस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जड वाहतूक ८५ प्रकरणे, ऑटोरिक्षा २१४ प्रकरणे, खासगी वाहने ६७ प्रकरणे यावर एकूण ६१,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून पुढील काळात कारवाई अधिक वाढवली जाणार आहे.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande