सोलापूर शहरातील १८ ठिकाणे धोक्याची, शांती चौकात ८ दिवसांत तीन ठार
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरातील १८ ठिकाणे धोक्याची असून गेल्या आठ दिवसांत शहरात विविध अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. सिग्नलची उंची कमी, सिग्नलची वेळ असमतोल, रस्त्यावरचे खोल खड्डे, जड वाहनांची अमर्याद वर्दळ आणि वाहतूक पोलिस
सोलापूर शहरातील १८ ठिकाणे धोक्याची, शांती चौकात ८ दिवसांत तीन ठार


सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

सोलापूर शहरातील १८ ठिकाणे धोक्याची असून गेल्या आठ दिवसांत शहरात विविध अपघातात तिघांना प्राण गमवावे लागले आहेत. सिग्नलची उंची कमी, सिग्नलची वेळ असमतोल, रस्त्यावरचे खोल खड्डे, जड वाहनांची अमर्याद वर्दळ आणि वाहतूक पोलिसांची मर्यादित उपस्थिती ही येथील अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

दरवर्षी सोलापूर शहराच्या हद्दीत सरासरी २०० ते २५० अपघात होतात. त्यात सरासरी ७५ ते ८० जणांचा जीव जातो, अशी नोंद ‘आरटीओ’कडे आहे. शहरातील शांती चौक व मार्केट यार्ड चौक सर्वात घातक आहेत. त्याठिकाणी महिन्यात किमान तीन-चार जणांचा मृत्यू होतोच. मागील आठ दिवसांत शांती चौकात तिघांना जीव गमवावा लागला आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर- हैदराबाद, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-अक्कलकोट या महामार्गांवर सोलापूर शहर हद्दीत सर्वाधिक अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) आहेत. रस्त्यालगत थांबलेली वाहने, अमर्याद वेग, सर्व्हिस रोडचा वापर नाही, घरी जाण्यासाठीचा शॉर्टकट, हेल्मेटविना दुचाकीस्वार, अशी त्यामागील कारणे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande