सोलापूरमध्ये विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा; थोडक्यात दुर्घटना टळली
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानच लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्
Airport Solapur Today


सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानच लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणाऱ्या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगलाच समज दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलं विमानतळ परिसरातील सुरक्षा भिंतीवरून उडी मारून विमानतळ परिसरात शिरले. विमानतळ परिसरात मोकळ्या आभाळात ते पतंग उडवू लागले. दुपारी दोनच्या सुमारास मुंबईहुन सोलापूरला एक विमान दाखल झाले. यामध्ये एकूण 34 प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर विमानतळाच्या रनवेवर हे विमान लँड करत असताना विमानाच्या पंखात मांजा अडकला.ही बाब पायलटच्या लक्षात येताच पायलट सतर्क झाले. त्यांनी सतर्कता दाखवत सुरक्षितपणे विमान लँड केले. त्यामुळे ३४ प्रवाशांवरचे मोठे संकट दूर झाले. याप्रकरणी शोध घेतला असता विमानतळ परिसरात काही अल्पवयीन मुलं पतंग उडवत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या मुलांचा शोध घेत मुलांना आणि त्यांच्या पालकांना चांगली समज दिली.

--------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande