सोलापूरात जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी आणि राम सातपुते यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पार्टीने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक प्रभारी व निवडणूक प्रमुख यांच्या नियुक्ती केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे पत्र काढले
सोलापूरात जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी आणि राम सातपुते यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी


सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टीने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक प्रभारी व निवडणूक प्रमुख यांच्या नियुक्ती केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे पत्र काढले असून ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या प्रभारीपदी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर जिल्हा माढा, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर सोलापूर जिल्हा पूर्व अशी स्थानिक स्वराज्य संस्थांव्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या नियुकत्या केल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह सोलापूर शहरासाठी विशेष करून रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कुठेही दोन्ही माजी मंत्री देशमुखांचा समावेश नाही हे विशेष आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande