साेलापूर पोलिस भरती; एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिस दलात ९० तर शहरात ७९ आणि कारागृह शिपायांची सुमारे १५ अशी एकूण १८४ पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्यभरात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्‌समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई, अशी १५ हजार ६३
साेलापूर पोलिस भरती; एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन


सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिस दलात ९० तर शहरात ७९ आणि कारागृह शिपायांची सुमारे १५ अशी एकूण १८४ पदांसाठी भरती होणार आहे. तर राज्यभरात पोलिस शिपाई, चालक शिपाई, बॅण्ड्‌समन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई, अशी १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. एकाच पदासाठी उमेदवाराने एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज केले तर ते बाद होणार आहेत.

पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना दहावी-बारावीचे गुणपत्रक, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), एमएससीआयटी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर (ज्यांना गरजेचे आहे त्या उमेदवारांसाठी) आणि पोलिस पाल्य, भूकंपग्रस्त, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, एनसीसी, अनाथ आरक्षणानुसार अर्ज करणाऱ्यांकडे त्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande