
पुणे, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण दक्षिण (बारामती), पुणे ग्रामीण उत्तर (मावळ) या भागांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तर निवडणूक प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बिडकर, आमदार महेश लांडगे, राहुल कुल आणि शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे.
येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यभरात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत.या निवडणुकींची व्यूहरचना करणे, उमेदवारांची चाचपणी करून त्यांची यादी अंतिम करणे, त्याचा प्रस्ताव प्रदेशाकडे पाठवणे, आवश्यक तेथे बाहेरील उमेदवारांचा पक्ष प्रवेश करून घेणे, मतदान केंद्राची रचना लावून घेणे अशी कामे संघटनेकडून केली जातात. यामध्ये निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांची भूमिका महत्त्वाची असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु