देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे मत चोरी - ब्रिज किशोर दत्त
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। - स्वातंत्र्यानंतर या देशांमध्ये सर्वात मोठा जो भ्रष्टाचार झाला असेल तो मत चोरी आहे. भाजपा सारख्या पक्षाने सत्तेचा वापर करत निवडणूक आयोगाला आपलं बाहुलं करून ठेवला आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या देशातील करोडो
देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे मत चोरी- ब्रिज किशोर दत्त


नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

- स्वातंत्र्यानंतर या देशांमध्ये सर्वात मोठा जो भ्रष्टाचार झाला असेल तो मत चोरी आहे. भाजपा सारख्या पक्षाने सत्तेचा वापर करत निवडणूक आयोगाला आपलं बाहुलं करून ठेवला आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या देशातील करोडो लोकांचे मतचोरण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे त्यामुळे या देशातील लोकशाही संकटात आली असून आता सामान्य जनतेने देशाची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या लढ्याला रस्त्यावर उतरून साथ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि नाशिक शहराचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी केले.

काँग्रेस पक्षाचा एक एक कार्यकर्ता घराघरात जाऊन मतदारांना आवाहन करणार आहे की आपले मत देताना काळजीपूर्वक द्यावे अशी जनजागृती करणार आहे खऱ्या अर्थाने सत्ताधारी भाजपचा मुखवटा फाडण्याचं काम काँग्रेसचे पदाधिकारी आगामी काळात करतील अशी पण माहिती ब्रिज किशोर दत्त यांनी दिली. काँग्रेस भवन येथे मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व ब्लॉग अध्यक्ष निलेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली वोट चोर गद्दी छोड या अभियाना अंतर्गत स्वाक्षरी मोहीम करण्यात आली.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी डोळ्यातील घालून काम करावे जास्तीत जास्त पदाधिकारी बूथ वर असण्याची गरज आहे जेणेकरून भारतीय जनता पक्षाला बोगस मतदान करण्यापासून रोखले जाईल. सर्व प्रभागांच्या कमिट्या व बुध यंत्रणा लवकरच केल्या जातील अशी माहिती प्रदेश सचिव आणि सप्रभारी श्रुती म्हात्रे यांनी दिली. येणाऱ्या महिनाभरामध्ये शहरातील सर्व प्रभाग कमिट्या सर्व भूत कमिट्या सर्व आघाडी विभाग सेल व सर्व ब्लॉगच्या कमिट्या पूर्ण करून आगामी महानगरपालिकेला निवडणुकीला सामोरे जाण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज आहे वेळ पडल्यास संपूर्ण जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल असे मत या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.काँग्रेस भवन परिसरातील शेकडो नागरिकांनी याप्रसंगी स्वाक्षरी करून भाजपाच्या मतचोरीच्या आणि निवडणुका आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला. याप्रसंगी बूट चोर गद्दी छोड राहुल गांधी जिंदाबाद काँग्रेस पार्टी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला शाहू खैरे , वत्सलाताई खैरे प्रदेश इब्राहिम पठाण, लक्ष्मण धोत्रे उल्हास सातभाई, मंगेश लहानगे , स्वाती जाधव, अल्तमस शेख, हनीफ बशीर, तनवीर तांबोळी , उद्धव पवार , इब्राहिम राजकुमार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande