सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : आ.डॉ.राहुल पाटील
परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। दगाबाज सरकारला सर्व जनता वर्षभरातच कंटाळली आहे येणारे सरकार आपलेच असणार आहे ही आपली आपल्या सोबतच सामान्य जनतेची मागणी आहे अशा या दगाबाज सरकारला उलथून टाकण्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार
सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : आ.डॉ.राहुल पाटील यांची टीका


परभणी, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

दगाबाज सरकारला सर्व जनता वर्षभरातच कंटाळली आहे येणारे सरकार आपलेच असणार आहे ही आपली आपल्या सोबतच सामान्य जनतेची मागणी आहे अशा या दगाबाज सरकारला उलथून टाकण्याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार आहे असे प्रतिपादन आ. डॉ.राहुल पाटील यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.शुक्रवारी परभणी तालुक्यातील पिंगळी येथे त्यांच्या उपस्थित शेतकरी संवाद बैठक होणार आहे. या निमित्ताने आ. डॉ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना पक्षाची आढावा बैठक पार पडली.

यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले घोटाळा करून सत्तेत आलेल्या दगाबाज सरकारला सर्व जनता कंटाळली आहे या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जनताच पुढाकार घेत आहे, आपला पक्ष संकटातून जात असला तरी एक दिवस नक्कीच फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार आहे. परभणी शहरात महापालिकेवर आपलीच सत्ता येणार हे निश्चित आहे, आपले कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य जनता देखील आपल्या सोबत झपाटून कामाला लागली आहे. त्यामुळे महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकणार आहे आणि येथूनच दगाबाज सरकारला उतरती कळा लागणार आहे.

पिंगळी येथे होणाऱ्या बैठकीला मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, ही बैठक आपल्या सर्वांसाठी, शेतकरी राजासाठी आहे, त्यांच्या प्रश्नासाठी आहे, त्यामुळे हातातली कामे सोडून या बैठकीला उपस्थित रहा असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.

बैठकीला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा करत आहेत शुक्रवारी परभणीत येत आहेत यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.डॉ. पाटील यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande