
नाशिक, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर चे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून वेदांशू पाटील यांची महाराष्ट्र चेंबर च्या राज्य मुख्य समन्वयक पदी निवड करण्यात आली.
अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी वेदांशू पाटील यांची महाराष्ट्र चेंबर मधील सर्व विभाग, शाखा व्यवस्थापन, मॅनेजिंग कमिटी, गव्हर्निंग कौन्सिल आणि इतर चेंबरच्या अधिपत्यात येणाऱ्या राज्यभरातील सर्व कामकाजांचे समन्वय साधण्यासाठी राज्य मुख्य समन्वयक म्हणून त्यांची ही निवड करण्यात आल्याचे सांगितले व शुभेच्छा दिल्या.
उपाध्यक्ष श्री संजय सोनवणे यांनी वेदांशु पाटील यांची निवड ही चेंबर मध्ये युवा पर्वाची सुरुवात असल्याचे आणि येत्या काळात महाराष्ट्र चेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर युवक हे सामील होतील तसेच गाव तिथे उद्योजक या संकल्पनेला मोठा फायदा होईल असे नमूद केले.
माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी वेदांशू पाटील यांच्यावर अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी महत्वपूर्ण जबाबदारी दिली असून ते निश्चित यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त करून वेदांशू पाटील यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष . रविंद्र माणगावे, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा,आणि सेक्रेटरी जनरल. सुरेश घोरपडे उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल उपाध्यक्ष संजय सोनवणे, शाखा चेअरमन अंजु सिंघल, को-चेअरमन भावेश मानेक, संजय राठी व राज्यातील चेंबरचे कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV