युवकांमधील कौशल्य आणि नव संकल्पना सादरीकरणास संधी देण्याची गरज - युवराज पाटील
पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। भारत हा युवकांचा देश असून या युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन तसेच त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी के
अरि


पुणे, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

भारत हा युवकांचा देश असून या युवकांमधील कौशल्याला प्रोत्साहन तसेच त्यांच्या नव संकल्पना सादरीकरणास संधी दिल्यास युवक व युवती जागतिक स्तरावर भारताचे नाव चमकवतील, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५- २६ चे ४ नोव्हेंबर २०२५ रोजी आबेदा इनामदार कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील व दिग्दर्शक व अभिनेते डॉ. राहुल बळवंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

श्री. पाटील म्हणाले, जगातील विविध देशामध्ये युवांची संख्या कमी होत आहे त्यामुळे भारतातमधून कौशल्य असणा-या युवांची मागणी मोठया प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर आपल्यात असणारे एआयचा वापर करून आपल्याकडे असणाऱ्या कौशल्यांचा विकसित करण्यात यावे. भविष्यात भारतातील युवकांचे कौशल्याचा उपयोग इतर देशांना होवू शकतो, असे श्री. पाटील म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande