ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन; मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। बोरगाव (ता. बार्शी) येथे मागील चार-पाच वर्षांपासून ऊसतोडीसाठी मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने यावेळीही बारा कोयत्यांची टोळी देतो, असे सांगून शेतकऱ्याकडून ६ लाख ५ हजार रुपये घेतले. पण टोळीही दिली नाही आणि रक्कमही परत केली न
ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याचे आश्वासन; मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल


सोलापूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। बोरगाव (ता. बार्शी) येथे मागील चार-पाच वर्षांपासून ऊसतोडीसाठी मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने यावेळीही बारा कोयत्यांची टोळी देतो, असे सांगून शेतकऱ्याकडून ६ लाख ५ हजार रुपये घेतले. पण टोळीही दिली नाही आणि रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांने दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात मुकादमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

गजानन विजय पवार (रा. भडकुंबा, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. राजाभाऊ कांदे (वय ५२, रा. बोरगाव, ता. बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना २६ मार्च ते ३१ मे दरम्यान घडली. फिर्यादी कांदे शेतीबरोबरच बबनराव शिंदे शुगर लिमिटेड कारखान्यासाठी तीन वर्षांपासून ऊस वाहतूक ठेकेदारी करतात. पवार मागील दहा वर्षांपासून बोरगाव(खुर्द) येथे ऊसतोड मुकादम म्हणून येत आहेत. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याची मागणी केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande