मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.) मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरातील भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस, शिवसेना यांना पक्षाच्या भूमिकेपेक्षा इच्छुक स्थानिक आघाडीकडे जास्त आकर्षित होत असल्याचे चित्र निर्माण झ
मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू


सोलापूर, 6 नोव्हेंबर (हिं.स.) मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरातील भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस, शिवसेना यांना पक्षाच्या भूमिकेपेक्षा इच्छुक स्थानिक आघाडीकडे जास्त आकर्षित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.भाजपदेखील स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवण्यासाठी अनुकूल आहे. मात्र, अद्यापही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होईल, असे सांगितले जात असले तरी इच्छुकांची संख्या सर्वाधिक भाजपमध्ये असल्याने नव्या जुन्यांना कशाप्रकारे न्याय मिळेल, हे काही दिवसात समजणार आहे. याआधी थेट जनतेतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुणा माळी या नगराध्यक्षा झाल्या होत्या. तब्बल नऊ वर्षांनंतर परत एकदा जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होणार असल्याने अनेक जणांनी आपली दावेदारी केली आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष अरुणा दत्तू, शिवशंभो प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम, रतन पडवळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पक्षनेते अजित जगताप यांच्या पत्नी सुप्रिया जगताप यादेखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. एकूण मतदार 28638 असून पुरुष 14251 व स्त्री 14385 व इतर 2 मतदार आहेत. 10 प्रभागांमध्ये 10 पुरुष आणि 10 महिलांना संधी मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande