लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने कर्ज स्वरूपात ट्रॅक्टरचे वाटप
लातूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने विविध कार्यकारी सेवा संस्था भातांगळी यांच्या वतीने सभासदांना कर्ज स्वरूपात ट्रॅक्टर वाटपाचा कार्यक्रमात 8 शेतक-यांना ट्रॅक्टरचे वाटप केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँके
अ


लातूर, 6 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने विविध कार्यकारी सेवा संस्था भातांगळी यांच्या वतीने सभासदांना कर्ज स्वरूपात ट्रॅक्टर वाटपाचा कार्यक्रमात 8 शेतक-यांना ट्रॅक्टरचे वाटप केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी सेवा संस्थांचा मोलाचा वाटा असून सेवा संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतक-यांना मोलाचे सहकार्य लाभत आहे.

शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी साठी काही शेतकरी इच्छूक होते मात्र विविध बँकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नव्हते. त्यामुळे भातांगळी विविध कार्यकारी सेवा संस्थेने यासाठी पुढाकार घेतला व यासंबंधी शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने तत्परतेने कर्ज उपलब्ध करून दिले.

लातूर जिल्ह्यात यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे येत आहेत.यासाठी त्यांना जे काही सहकार्य आवश्यक आहे ते करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande