मागणी असणाऱ्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निवड करावी - अमरावती जिल्हाधिकारी
अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। युवकांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात मागणी असणाऱ्या रोज
मागणी असणाऱ्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निवड करावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


अमरावती, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

युवकांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात मागणी असणाऱ्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण लक्ष्य वाटप करण्याबाबत जिल्हास्तरीय समिती सभा पार पडली. यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून यावर्षी प्रशिक्षणावर 1 कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. युवकांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रशिक्षण हे आवश्यक असून आवश्यकतेप्रमाणे निधी देण्यात येईल. जिल्ह्यात मागणी असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम ठरविण्यात यावेत. यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात यावी. प्रशिक्षणानंतर प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न येत असल्याने यातील प्रशिक्षणार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी त्यांना बँकांशी संलग्न करून द्यावे.

जिल्हा नियोजनमधून यावर्षी बचतगटांना एक लाख रूपये देण्यात येणार आहे. त्यामुळे किसान ड्रोनच्या प्रशिक्षणामध्ये महिलांना प्राधान्य द्यावे. प्रशिक्षणानंतर बचतगटाच्या माध्यमातून ड्रोन खरेदी केल्यास महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी आधारीत उद्योगासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी कृषि विकास केंद्रांना सहभागी करून घ्यावे. यात कमी खर्चात उद्योग सुरू करता येतील, असे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावे. शहरी भागात उद्योजकांना प्रशिक्षित लेखापालाची गरज आहे. त्यामुळे यात कार्यरत संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जागर करीअरचा, अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम आदींचा आढावा घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande