महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विषयी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन
लातूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम, २०२५ या कायद्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, खाजगी पदयोजन एजन्सी तसेच संबंधित भागधारक यांनी या प्रारुप नियमांबाबत आपले हरकती, सूचना
महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विषयी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन


लातूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम, २०२५ या कायद्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, खाजगी पदयोजन एजन्सी तसेच संबंधित भागधारक यांनी या प्रारुप नियमांबाबत आपले हरकती, सूचना किंवा अभिप्राय मागविण्यात आलेले आहेत.

यासाठी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या गुगल फॉर्म (Google Form) लिंकवर 11 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत संबंधितांनी त्यांच्या हरकती, सूचना किंवा अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त नि.ना.सूर्यवंशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande