मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी
बीड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करणे बाबत बीड जिल्ह्यातील खासदार आणि आमदाराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्र दिले आहेत. मराठा संघर्ष योध्दे मनोज दादा जरांगे पाट
अ


बीड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करणे बाबत बीड जिल्ह्यातील खासदार आणि आमदाराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्र दिले आहेत.

मराठा संघर्ष योध्दे मनोज दादा जरांगे पाटील यांची सुपारी देवुन हत्या घडवून आणण्याच्या कटाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करणे बाबत व त्यांना Z+ सुरक्षा प्रदान करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे बीड जिल्ह्याचे खासदार साहेब व आमदार यांनी मागणी केलेली आहे आणि सर्व समाजाची देखील मागणी आहे.

संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात दोन संशयीत आरोपींना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरुपाचा असुन, जनतेमध्येही याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

तरी आपण या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी S.I.T. (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande