कोल्हापूरच्या स्वागत कमानीचा उदय आणि अस्त
कोल्हापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील मुख्य मार्गावर गेली २७ वर्षे उभी असलेली स्वागत कमान अखेर मध्यरात्री महानगर पालिकेच्या यंत्रणेने जमीनदोस्त केली. चुकीच्या पद्धतीने केलेले दर्जाहीन बा
जमीनदोस्त स्वागत कमान


कोल्हापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील मुख्य मार्गावर गेली २७ वर्षे उभी असलेली स्वागत कमान अखेर मध्यरात्री महानगर पालिकेच्या यंत्रणेने जमीनदोस्त केली. चुकीच्या पद्धतीने केलेले दर्जाहीन बांधकाम यामुळे वाहतुकीस अडथळा आणि धोकादायक बनलेल्या या स्वागत कमानीचा अखेर अस्त झाला.

कोल्हापूर महानगर पालिकेत जनसंपर्क अधिकारी पदावर असलेल्या अधिकऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन, स्वतःची जाहीरात कंपनी सुरु केली होती. या जाहीरात कंपनीमार्फत महापालिकेशी करार करून सर्व हक्क कंपनीकडे घेऊन कमान उभी केली होती. त्यानंतर २५ वर्षे ही कमान या कंपनीकडे राहीली. तीन वर्षापूर्वी कोल्हापूर शहराचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी ही स्वागत कमान खाजगी कंपनी किंवा व्यक्ती कडे नसावी. त्यावर जाहीराती ऐवजी राजर्षी शाहू महाराज यांचेच नाव असावे अशी भुमिका घेऊन सदर जाहीरात कंपनीस पर्यायी जागा देऊन या कमानीवरील हक्क सोडण्याबाबत यशस्वी प्रयत्न केले. या कंपनीने कमानीवरील हक्क सोडल्यानंतर कमानीचा ताबा कोल्हापूर महानगर पालिकेकडे आला होता.

चुकीच्या पद्धतीने केलेले दर्जाहीन बांधकाम यामुळे वहातुकीस अडथळा आणि धोकादायक बनलेल्या या स्वागत कमानी बाबत वारंवार होणारी टिका आणि सोशल मिडियावर चर्चा झाल्या. एका व्यक्तीने संपूर्ण जर्जर होऊन धोकादायक बनलेल्या कमानीचा व्हिडीओ करून व्हायरल केला. यामुळे कोल्हापूर शहरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गांभिर्याने दखल घेऊन महानगरपालीकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली. ही कमानच काढून टाकून या मार्गावर नवीन स्वागत कमान बांधावी अशा सुचना दिल्या. तसेच नवीन स्वागत कमानी साठी त्वरीत निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. याबरोबरच त्वरीत कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे काल महापलिकेच्यावतीने ही कमान मध्यरात्री काढून टाकण्याचे नियोजन केले. यासाठी रात्रभर या मार्गावरून शहरात ये जा करणारी वाहतूक उचगाव आणि कसबा बावडा मार्गे वळवून त्याबाबत दिवसभर सुचना देण्यात आल्या.

रात्री १० वाजता आवश्यक यंत्रसामुग्री जेसीबी, पोकलँड, टिपर आदी मशीनरी, इंजिनियर, तंत्रज्ञ, कामगार असे मनुष्यबळ यांच्या सहाय्याने कमान पाडण्याचे काम सुरु केले. १२ - ३० वाजे पर्यंत कमान जमीनदोस्त करून पहाटेपर्यंत बांधकामातील सर्व साहित्य बाजूला करून हा मार्ग सकाळी वहातुकीसाठी खुला करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande