
छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन येथील निवासस्थानी आज श्री भारतमाता पूजन करून “वंदे मातरम” चे सामुदायिक गायन केले. व उपस्थित सर्वांशी संवाद साधला.
देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवानिमित्त आज देशभर वंदे मातरम चा इतिहास आणि महत्व या विषयावर कार्यक्रम होत आहेत.
या प्रसंगी आमदार संतोष पाटील दानवे यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारीवर्ग, प्राचार्य, प्राद्यापक, शिक्षक, महिला प्रमुख, पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis