
छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।वंदे मातरम् गीताला 150 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजी नगर येथील झाशी राणी पुतळ्याजवळ, क्रांतीचौक येथे विविध देशभक्तीपर गीत व बँड पथक वाजवून कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, माजी अर्थ राज्य मंत्री भागवत कराड , संगठन मंत्री संजय कोडगे, शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, आमदार संजयकेणेकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis