चंद्रपूर : शासकीय आश्रम शाळेतील रिक्त जागेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, 8 नोव्हेंबर (हिं.स.)।शासकीय आश्रम शाळेतील रिक्त जागेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत येत असलेल्या शासकिय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त असलेली पदे तात्पुरत्या स्वरुप
चंद्रपूर : शासकीय आश्रम शाळेतील रिक्त जागेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


चंद्रपूर, 8 नोव्हेंबर (हिं.स.)।शासकीय आश्रम शाळेतील रिक्त जागेकरीता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत येत असलेल्या शासकिय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील रिक्त असलेली पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत बाह्यस्त्रोत संस्था छत्रपती शिवाजी महाराज, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व महाराष्ट्र विकास गृप यांना आदेश देण्यात आले. सदर संस्थेमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असून चंद्रपूर प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेवर खालील प्रमाणे जागा रिक्त आहेत.

1. शासकीय आश्रम शाळा, जिवती (उच्च माध्यमिक शिक्षक), 2. शासकीय आश्रम शाळा देवाडा (प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक), 3. शासकीय आश्रमशाळा मरेगाव (माध्यमिक शिक्षक), 4. शासकीय आश्रम शाळा पाटण, (प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक), 5. शासकीय आश्रम शाळा देवई (माध्यमिक शिक्षक), 6. शासकीय आश्रमशाळा मंगी (माध्यमिक शिक्षक) आणि 7. शासकीय आश्रमशाळा रुपापेठ (माध्यमिक शिक्षक)

सदर सर्व आश्रमशाळेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात बाहयस्त्रोत संस्थेमार्फत रिक्त असलेल्या जागेकरिता 7 नोव्हेंबर 2025 या कालावधीपर्यंत https://mvgcompany.in या संकेतस्थळावर स्थानिक उमेदवारांनी अर्ज करावे, असे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande