ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे शावक जेरबंद
चंद्रपूर, 8 नोव्हेंबर (हिं.स.)।ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार वावर करून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 यास दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी वन विभा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे शावक जेरबंद


चंद्रपूर, 8 नोव्हेंबर (हिं.स.)।ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार वावर करून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 यास दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. सदर जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

यापूर्वी 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना जिप्सी चालक अमोल बबन नन्नवारे वय 37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीच्या आधारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी करून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून सदर वाघास जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले होते.

--------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande