
नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.)।
- महानगरपालिकेच्या बीडी भालेकर विद्यालय वाचविण्यासाठी म्हणून योग्य ते प्रयत्न केले जातील आणि प्रशासनाला तसे आदेश दिले जातील, अशी आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
महानगरपालिकेच्या मालकीची असलेली बिडी भालेकर हे विद्यालय जुने झाले असून ती इमारत पाडुन त्या ठिकाणी नवीन इमारत करण्यासंदर्भातील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे त्या पद्धतीने पाडकाम सुरू करण्यात आले असून त्याला स्थानिक नागरिकांनी बिडी भालेकर बचाव समिती स्थापन करून विरोध सुरू केला आहे या शाळेच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामध्ये ,राजू देसले, राजेंद्र बागुल, व अन्य स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलन स्थळी दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी भेट दिली होती त्यावेळी त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे प्रत्यक्ष उपोषण करताना भेटतील असे आश्वासन दिले होते .
आज शनिवारी राज्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बिडी भालेकर बचाव समितीच्या सुरू असलेल्या आंदोलन स्थळी भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी प्रशासनाला याबाबत योग्य आदेश दिले जातील याबाबत आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर अजून पर्यंत तरी आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतलेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV