निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच संधी - समीर भुजबळ
नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्टिक मिरीट असणाऱ्या उमेदवारांना सर्वानुमते संधी देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उ
निवडून येणाऱ्या  उमेदवारांनाच संधी -  समीर भुजबळ


नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्टिक मिरीट असणाऱ्या उमेदवारांना सर्वानुमते संधी देण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार पंकज भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शअंबादास बनकर, श राधाकिसन सोनवणे, पंढरीनाथ थोरे, ज अरुण थोरात, वसंत पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, श ज्ञानेश्वर शेवाळे, किसन धनगे, मोहन शेलार, संजय बनकर, सुरेखा नागरे, शिवाजी सुपनर, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, प्रकाश वाघ, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवार बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अतिशय चांगले वातावरण असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सर्वांनाच संधी देणे शक्य होणार नाही. ज्यांच्याकडे इलेक्टिक मिरीट, दांडगा जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना सर्वानुमते संधी देण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय हा मंत्री छगन भुजबळ साहेब हे घेणार आहे. त्यामुळे ज्यांना संधी मिळणार नाही त्यांनी निराश न होता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर युती करायची की नाही हा सर्वस्वी निर्णय स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने दिलेला आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती बघून ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कागदपत्रांबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande