कोल्हापूर : टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर, 8 नोव्हेंबर (हिं.स.) : शिक्षण विभागाने १३ फेब्रुवारी २०१३ रोजी काढलेल्या आदेशानुसार प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही ही
टीईटी बंधनकारक निर्णय रद्द करा” मागणीचे  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


कोल्हापूर, 8 नोव्हेंबर (हिं.स.) : शिक्षण विभागाने १३ फेब्रुवारी २०१३ रोजी काढलेल्या आदेशानुसार प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही ही परीक्षा अनिवार्य ठरविली. या निर्णयाला राज्यभरातील शिक्षकांकडून तीव्र विरोध होत असून, कोल्हापुरातही या निर्णयाविरोधात आज मोठा मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील तीसहून अधिक शिक्षक संघटनांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. दसर्‍या चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी शिक्षकांच्या हातात असलेले फलक हे राज्य सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधणारे होते. “अनुभवी शिक्षकांवर अन्याय बंद करा”, “टीईटी बंधनकारक निर्णय रद्द करा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. २५ ते ३० वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या शिक्षकांना पुन्हा टीईटी परीक्षा द्यावी लागणार असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा निर्णय अन्यायकारक असून शिक्षण क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी शिक्षकांची भावना आहे. शिक्षक संघटनांनी राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे. सरसकट टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा, यासाठी शिक्षकांच्या या आंदोलनाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande