
रत्नागिरी, 8 नोव्हेंबर, (हिं. स.) : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण रविवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी गणेशगुळे (ता. रत्नागिरी) येथे करण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याचे मूळ स्थान रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आहे. तेथे हा शिलालेख बसविण्यात येणार आहे.राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानयांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या वेळी शिवस्तुती पठण आणि विविध प्रात्यक्षिके असे कार्यक्रमही होणार आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये मंत्री नितेश राणे यांच्यासह माजी सरपंच सौ. श्रावणी विक्रांत रांगणकर याही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. पद्मजा अभ्यंकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. दीपा पाटकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यवाहिका सौ. मीरा भिडे आणि कोकण प्रांत सहकार्यवाहिका सौ. उमा दांडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी