कोकण विभागीय लोकशाही दिन 10 नोव्हेंबर रोजी
नवी मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोकण विभागीय लोकशाही दिन 10 नोव्हेंबर रोजी


नवी मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।

कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवार दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

लोकशाही दिनाच्या बैठकीस सर्व विभागीय स्तरावरील कार्यालय प्रमुख यांनीच उपस्थित असणे आवश्यक आहे. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी विभागीय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे कोंकण विभागाच्या अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande