अकोल्यातील बेपत्ता तिन्ही अल्पवयीन मुलं अखेर सापडली !
अकोला, 10 डिसेंबर (हिं.स.)। अकोला शहरातील तीन अल्पवयीन मुलं सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली होती. आशिष मुरई, आदित्य सुगंधी आणि दर्शन रंधिरे हे तिघेही सायंकाळी घराबाहेर पडले मात्र परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाई
P


अकोला, 10 डिसेंबर (हिं.स.)।

अकोला शहरातील तीन अल्पवयीन मुलं सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ उडाली होती. आशिष मुरई, आदित्य सुगंधी आणि दर्शन रंधिरे हे तिघेही सायंकाळी घराबाहेर पडले मात्र परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईकांपासून परिसरात शोध घेतला, पण मुलांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. तातडीने सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, मुलं एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त घरून बाहेर पडल्याचे समोर आले. ते अकोल्यावरून शेगावला जाण्यासाठी निघाले, मात्र ट्रेनमध्ये झोप लागल्याने थेट मुंबईला पोहोचले. त्यानंतर मुंबईहून परत अकोल्याची दिशांनी हे तिन्ही मुलं निघाले होते. दरम्यान भुसावळ रेल्वे स्टेशन वरती थांबले. तेव्हा अकोला पोलिसांनी भुसावळच्या जीआरपीएफ पोलिसांच्या मदतीने आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तिघेही भुसावळ रेल्वे स्टेशनवर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस पथकाने धाव घेत त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. मुलांना घेऊन पथक अकोल्यात परतल असून मुलं घरून का, कसे? आणि कोणत्या कारणावरून गेले? याचा तपास पोलीस करीत आहेत. तिने मुलं सुखरूप मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलिसांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande