
बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)
परळी नगर पालिकेच्या निवडणुकीत चार प्रभागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सुधारित कार्यक्रमात तीन जणांनी माघार घेतली.
परळी वैजनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात नगरपरिषद निवडणूक मधील चार प्रभागातील जागांचा समावेश आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुक आयोगाच्या परिपत्रकानुसार आक्षेप आलेल्या जागांपैकी प्रभाग क्रमांक ३ मधील दोन्ही जागासह प्रभाग क्रमांक ९ अ, प्रभाग क्रमांक ते १४ ब या जागेवरची निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान एकूण ५ माघार जाणांनी माघार घेतली आहे. कल्याणी रामदास (शिवसेना), प्रभाग १४ ब-पूजा अभिजीत शेंद्रे (अपक्ष) यांनी सुरुवातीला माधार घेतली.
सुलतानाबी नजीर (अपक्ष), प्रभाग ३ अ कुरेशी मुस्तकिम रियाज कसाब (अपक्ष), प्रभाग ३ ब शेख यासमीन अजीम, (अपक्ष) यांनी माघार घेतली.
नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम अनुसार ४ जागेसाठी १९ आता रिंगणात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis