शिरूर कासार येथे 16 आणि 17 डिसेंबरला सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन
बीड, 11 डिसेंबर (हिं.स.) सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथे १६ ते १७डिसेंबर दरम्यान होत आहे. सिंदफणा नदीच्या काठावर शिरूर तालुक्यात अनेक गुणीजनांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असुन शिक्षण, शिक्षण, सेवा, शेती, कला या क्षेत्रातील काह
शिरूर कासार येथे 16 आणि 17 डिसेंबरला सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन


बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)

सातवे सिंदफणा मराठी साहित्य संमेलन शिरूर कासार येथे १६ ते १७डिसेंबर दरम्यान होत आहे. सिंदफणा नदीच्या काठावर शिरूर तालुक्यात अनेक गुणीजनांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असुन शिक्षण, शिक्षण, सेवा, शेती, कला या क्षेत्रातील काही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सिंदफणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सिंदफणा सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने एकलव्य विद्यालयात साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन निवड समितीने गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यामध्ये

सिंदफणा शेती गौरव अर्जुन पाखरे (मानूर), योगेश बडे (लोणी), विष्णूपंत बेदरे (राक्षसभूवन), पोपटराव कोकाटे (मार्कडवाडी),

शीतल काळदाते जगन्नाथ गाडेकर (शिरूर) यांना तर सिंदफणा शिक्षण सेवागौरव पुरस्कार गोरक्ष खेडकर (शिरूरकासार), आशा ढाकणे (रायमोहा), (मानूर), भागवत (जाटनांदूर), मनिषा (पांगरी), प्रतिभा (गोमळवाडा) श्रीकांत (तिंतरवणी) जितेंद्र (तागडगाव) आरती (हिवरसिंगा) उद्धव मेहेत्रे पोटभरे मंडलिक देवढे सांगळे सोनवणे परदेशी(आर्वी) शीला सोनवणे (फुलसांगवी) सुनील परजणे (खालापुरी) यांना प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच कावेरी नागरगोजे (शांतीवन) आर्वी, कोमल तांबे (आजोळ) राक्षसभूवन, सृष्टी सोनवणे (सर्पराज्ञी) तागडगाव, मयुरी राजहंस (सेवाश्रम) येळंब ब्र. सोनाली गायकवाड (सेवातिर्थ) मातोरी यांना सिंदफणा सेवागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कलेच्या क्षेत्रात विष्णू केदार (वारणी) सिनेकलावंत, केशव बडे (वारणी) ध्वनीकला, तुळशीराम काळे (मातोरी) नाट्य यांना सिंदफणा कलागौरव तसेच जिल्ह्यातील आठ यशस्वी स्पर्धकांना जिल्हास्तरीय सिंदफणा वक्तागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande