पाठपुराव्यानंतर बर्दापूर फाटा येथे एसटी बस थांबवण्याचे आदेश
प्रवाशांची मोठी गैरसोय टळली
पाठपुराव्यानंतर बर्दापूर फाटा येथे एसटी बस थांबवण्याचे आदेश


बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर ते लातूर आणि अंबाजोगाई ते लातूर मार्गावरील बर्दापूर फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस थांबवाव्यात. असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजी नगर येथील कार्यालयाने काढले आहेत.

यामुळे प्रवाशांची बसअभावी होणारी गैरसोय टळणार असून प्रवासासाठी यापुढे वेळेवर बस उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत इंगळे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. अनेक वेळा निवेदने दिली. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. बर्दापूर येथे बसथांबा झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आता सोयीचे ठरणार आहे. त्याच प्रमाणे महिला, जेष्ठ नागरीक यांचा प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे बर्दपूर येथील नागरीकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande