बीड ते वडवणी दरम्यान होणार रेल्वेची हायस्पीड चाचणी
बीड, 11 डिसेंबर (हिं.स.) अहिल्यानगर-बीड- परळी रेल्वेमार्गावर बीड ते वडवणी दरम्यान हायस्पीड चाचणी होणार आहे. सुमारे १३० प्रतितास वेगाने ८ डब्यांसह रेल्वे रुळावरुन धावणार आहे. या हायस्पिड चाचणीची मोठी उत्सुकता वडवणीकरांना आहे. मागील अनेक वर्षांपास
बीड ते वडवणी दरम्यान होणार रेल्वेची हायस्पीड चाचणी


बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)

अहिल्यानगर-बीड- परळी रेल्वेमार्गावर बीड ते वडवणी दरम्यान हायस्पीड चाचणी होणार आहे. सुमारे १३० प्रतितास वेगाने ८ डब्यांसह रेल्वे रुळावरुन धावणार आहे. या हायस्पिड चाचणीची मोठी उत्सुकता वडवणीकरांना आहे.

मागील अनेक वर्षांपासून अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वे मार्गासाठी जिल्हावासीय लढा देत आहेत. ४० वर्षांच्या आंदोलनानंतर १७सप्टेंबर रोजी अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. बीड ते परळी पर्यंतच्या टप्प्याचे काम आता प्रगतीपथावर आहे. बीड ते वडवणी दरम्यान रेल्वे रुळ अंथरण्याचे काम झाले आहे.

या मार्गावर रेल्वे धावण्यास सज्ज झाली आहे. हायस्पिडने रेल्वेच्या डब्यांसह चाचणी घेतली जाणार आहे. सुमारे १३० किमी प्रतितास वेगाने ८ डबे घेऊन इंजीन धावणार आहे. त्यामुळे या चाचणीची मोठी उत्सुकता दिसत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande