अकोल्यात माजी विद्यार्थ्यांचा २७ वर्षांनी स्नेहमेळावा' उत्साहात संपन्न!
अकोला, 10 डिसेंबर (हिं.स.)। १९९७-१९९८ या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतरचे ‘स्नेहमीलन’ अकोला येथील हॉटेल विनस इंटरनॅशनल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या दुर्मिळ भेटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक वृ
अकोल्यात माजी विद्यार्थ्यांचा २७ वर्षांनी स्नेहमेळावा' उत्साहात संपन्न!


अकोला, 10 डिसेंबर (हिं.स.)।

१९९७-१९९८ या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतरचे ‘स्नेहमीलन’ अकोला येथील हॉटेल विनस इंटरनॅशनल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या दुर्मिळ भेटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तसेच ८३ जणांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका प्रतिभाताई देशमुख होत्या,तर ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध कवी, अभिनेते आणि टीव्ही कलाकार किशोर बळी हास्य सम्राट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक खास रंगत आली.

या स्नेहमेळाव्यात उपस्थित शिक्षकवृंद श्री.भरणे सर यांनी मार्गदर्शन केले. श्री मुळे सर, श्री.काळे सर, श्री धडम सर, श्री.कलाल सर, श्री. महल्ले सर, श्री. पाटील सर , श्री.सांभारे सर, श्री.वाकडे सर,श्री दत्ता पाटील बोर्डे, श्री.दिवाकर बढे व इतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे २७ वर्षांनी झालेले हे मिलन अत्यंत भावूक आणि आनंददायी ठरले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.

मान्यवर आणि शिक्षकवृंदाचे स्वागत शाल, बुके आणि स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande