
अकोला, 10 डिसेंबर (हिं.स.)।
जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला.
यावेळी सामाजिक न्याय संरक्षण संघाचे अध्यक्ष ऍड विजयकुमार गडलिंग, जिल्हा कारागृह अधीक्षक विजय काळे, विधी अधिकारी संदीप कंकाळ व अधीक्षक शाम धनमने यांनी मार्गदर्शन केले.
मानवी हक्कांची व्याख्या, संबंधित विधी व कायदे, जाहीरनामा आदी विविध बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 1948 मध्ये मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यात येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे