
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। येत्या नववर्षात म्हणजेच जवळपास जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगातर्फे अमरावती महानगरपालिका निवडणूक होणार असे चित्र दिसत असताना भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याने कमर कसलेली आहे, निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत बूथ बांधणी तथा प्रभाग निहाय विविध कार्यक्रम केल्यानंतर आता पक्षाच्या वतीने इच्छुक असलेल्या उमेदवारांकरिता अर्ज वितरण व प्रत्यक्ष मुलाखत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
स्थानिक लक्ष्मण स्मृती भाजपा कार्यालय राजापेठ अमरावती येथे दिनांक. १० व ११ व १२ डिसेंबर २०२५ रोजी सर्व प्रभागांच्या इच्छुक उमेदवार करिता दोन्ही दिवस सकाळी १० वाजे पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे फॉर्म उपलब्ध असणार आहेत,तसेच या फॉर्म करिता सर्वसाधारण गटा करिता १०००/- रुपये शुल्क आकारले जाणार असून राखीव गटा करिता अनु.जाती व अनु. जमाती ना.मा.प्र. गटा करिता तसेच महिला आरक्षण गटातील इच्छुक उमेदवार करिता ५००/- रुपये शुल्क आकारल्या जाणार आहे,भरलेल्या अर्जासह दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून प्रभाग क्रमांक ०१ ते प्रभाग क्रमांक ११ च्या इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार तसेच दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ११ ते प्रभाग क्रमांक २२ या प्रभातील इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखत सकाळी १० वाजेपासून प्रत्यक्ष मुलाखत घेण्यास सुरुवात होणार.
याबाबत अधिक माहिती देत भाजपा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ नितीनजी धांडे यांनी सांगितले की,भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढण्याची आपली स्वतःची एक पद्धती आहे, निवडणूक लोकसभेची असो की स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रत्येकच निवडणूक तेवढीच महत्वपूर्ण आहे आणि संपूर्ण शक्ती या निवडणूक मध्ये झोकून विजयश्री प्राप्त करण्याच्या अनुषंगाने नियोजन आखले जाते,तसेच भाजपामध्ये सामूहिक निर्णय पद्धती तथा लोकशाही, सुद्धा आहे, त्यामुळे सुरुवातीला अमरावती मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागामध्ये पक्षातर्फे निरीक्षक पाठवल्या गेले, यावेळी भाजपच्या तळागाळात काम करणाऱ्या अगदी बूथ प्रमुखापासून ते प्रदेश पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले, आता प्रत्यक्ष मुलाखत द्वारे सुधा उमेदवार निवडण्यासाठी पक्षाने ही योजना आखलेली आहे.याकरिता येत्या अमरावती मनपा निवडणुकीत भाजपा तर्फे निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून प्रक्रियेला पुढे जावे असे आव्हान भाजपा अमरावती शहर जिल्हा तर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी