‘ब्लड फॉर आंबेडकर’ उपक्रमाला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील मेल मोटर डेपो (डाक विभाग) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘अखिल भारतीय पोस्टल एससी/एसटी कर्मच
‘ब्लड फॉर आंबेडकर’ उपक्रमाला पनवेलात उत्स्फूर्त प्रतिसाद


रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील मेल मोटर डेपो (डाक विभाग) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘अखिल भारतीय पोस्टल एससी/एसटी कर्मचारी कल्याण संघटना’ यांच्या वतीने “ब्लड फॉर आंबेडकर” या प्रेरणादायी सामाजिक संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम नुकताच राबवण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मेल मोटर सेवा, मुंबईचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंतकुमार सिंग हे विशेष निमंत्रक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सर्कल सचिव जयराम जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ शब्दांनी नव्हे, तर कृतीने आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कर्मचारी व नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ४० स्वयंसेवकांनी उत्साहाने रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.रक्ताचा तुटवडा भरून काढणे आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचवणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डाक विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. “ब्लड फॉर आंबेडकर” या संकल्पनेतून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचवण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहभागी रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. समाजहितासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande