रत्नागिरी : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे विविध योजनांची जनजागृती
रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा दाखविला
रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जनजागृती


रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला हिरवा दाखविला.

समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी यावेळी उपस्थित होते.अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती या एलईडी व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची साधने, कन्यादान योजना, स्टँडअप योजना, कृषी स्वावंलबन योजना, दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम, रमाई आवास योजना, राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता योजना, स्वाधार योजना यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कृषी, आरोग्य, वन विभाग, महसूल विभाग, कौशल्य विकास आदींचा समावेश आहे.अमली पदार्थांपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मिशन फिनिक्स अंतर्गत मोहीम सुरू केली आहे. सायबर गुन्हे घडू नयेत, फसवणुकीपासून नागरिकांनी दूर राहावे, याबाबत जनजागृतीपर संदेश, सायबर फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते, त्यापासून काय काळजी घ्यावी, याचाही या जनजागृती मोहिमेत समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande