खुलताबाद येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय इतिहास परिषदेचे ४५ वे अधिवेशन
छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर (हिं.स.)। चिश्तिया कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि मराठवाडा इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इतिहास परिषदेचे ४५ वे अधिवेशन १२ व १३ डिसेंबर रोजी होणार आहे. हे अधिवेशन चिश्तिया महाविद्यालयाच्या
खुलताबाद येथे शुक्रवारपासून राष्ट्रीय इतिहास परिषदेचे ४५ वे अधिवेशन


छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर (हिं.स.)।

चिश्तिया कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि मराठवाडा इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय इतिहास परिषदेचे ४५ वे अधिवेशन १२ व १३ डिसेंबर रोजी होणार आहे. हे अधिवेशन चिश्तिया महाविद्यालयाच्या कॅम्पस २ मध्ये पार पडणार आहे.

अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद असीफ झकेरिया भूषवणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते होईल. इतिहासतज्ज्ञ प्रा. सुनीता बोर्डे-खडसे बीजभाषण करणार आहेत. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास या तीन कालखंडांवर देशभरातील संशोधक आपले संशोधन सादर करणार आहेत. प्राचीन कालखंड सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद गावंडे, मध्ययुगीन सत्राचे अध्यक्ष प्रा. विजय पांडे आणि आधुनिक सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी असतील. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सत्रे पार पडणार आहेत. अधिवेशनाचा समारोप १३ डिसेंबर रोजी होईल. समारोप समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. वाल्मीक सरवदे प्रमुख पाहुणे असतील. त्यांच्यासोबत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. अपर्णा पाटील आणि उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहंमद अय्युब उपस्थित राहणार आहेत. आयोजन समितीत डॉ. गनी पटेल, डॉ. हरी जमाले यांचा मोलाचा सहभाग आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande