लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेले होते? - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजनेवरून आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट, मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधक गदारोळ घालत होते. या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) : हिवाळी अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजनेवरून आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट, मुद्देसूद उत्तरे दिल्यानंतरही विरोधक गदारोळ घालत होते. या गोंधळानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांवर हल्लाबोल करत सडेतोड प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले की, योजना सुरू करतानाच तिला “फसवी घोषणा’’ ठरवण्याचे काम विरोधकांनी केले. इतकेच नव्हे तर योजना बंद व्हावी म्हणून तुमच्याच नेत्यांनी कोर्टाची पायरी चढली. “ वडपल्लीवार कोर्टात गेले नव्हते का? मग आज कोणत्या तोंडाने लाडक्या बहिणींचा मुद्दा काढता?” असा तिरकस सवाल शिंदेंनी केला.

ही योजना थांबवण्यासाठी केलेल्या विरोधकांच्या प्रयत्नांना हायकोर्टानेही फटकारले होते. महिलांचा लाभ न थांबू देण्याचा निर्धार सरकारने केला, असे शिंदे म्हणाले. आचारसंहितेच्या काळातही लाभार्थींना अडथळा येऊ नये म्हणून अॅडव्हान्स निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. “लोकांचे पैसे लोकांनाच देण्याची दानत आम्ही दाखवली, तुमच्या सरकारने कधी नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. दिलेली सर्व वचने योग्य वेळी पूर्ण केली जातील, हा ठाम संदेश शिंदेंनी विरोधकांना दिला. “लाडक्या बहिणींनीच तुमचा टांगा पलटी केला आहे. त्यामुळे योजनेच्या विरोधात यापुढे एकही शब्द काढू नका,” असा इशाराही शिंदेंनी विरोधकांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande