एम.कॉम हिवाळी २०२५ परीक्षेच्या नांदेडच्या दोन केंद्रात बदल
नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ च्या एम.कॉम पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ डिसेंबर, २०२५ पासून सुरू होत आहेत. यासाठी यशवंत महाविद्यालय, नांदेड आणि पीपल्स महाविद्यालय, नांदेड या दोन्ही महाविद्याल
एम.कॉम हिवाळी २०२५ परीक्षेच्या नांदेडच्या दोन केंद्रात बदल


नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी २०२५ च्या एम.कॉम पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १२ डिसेंबर, २०२५ पासून सुरू होत आहेत. यासाठी यशवंत महाविद्यालय, नांदेड आणि पीपल्स महाविद्यालय, नांदेड या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र के.आर.एम. महिला महाविद्यालय, नांदेड येथे निश्चित करण्यात आले होते.

मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले असून आता दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर पूर्वीप्रमाणे के.आर.एम. महिला महाविद्यालयाचे नाव छापलेले असले, तरीही त्याच प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथे परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, नवीन प्रवेशपत्रे महाविद्यालयामार्फत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande