मेळघाटातील आंदोलनकर्ते सहा दिवसात नागपूर अधिवेशनावर धडकणार
- 60 किलोमीटर प्रवास करत आंदोलनकर्ते अमरावती शहरात दाखल अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील आदिवासी बांधव व मका उत्पादक शेतकऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांच्या नेतृत्वात काल पासून परतवाडा येथून पायदळ पदयात्रा स
60 किलोमीटर प्रवास करत आंदोलनकर्ते अमरावती शहरात दाखल.. सहा दिवसाचा पायदळ प्रवास करत धडकणार नागपूर अधिवेशनावर.


- 60 किलोमीटर प्रवास करत आंदोलनकर्ते अमरावती शहरात दाखल

अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील आदिवासी बांधव व मका उत्पादक शेतकऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांच्या नेतृत्वात काल पासून परतवाडा येथून पायदळ पदयात्रा सुरू झाली आहे. आज थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आदिवासी बांधवांनी बसत ठिय्या आंदोलन मांडले आहे. सहा दिवसाचा पायदळ प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे.

मका पिकाला 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावं, यासह पाणी,वीज, रस्ते अन्य मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनावर हा पायदळ मार्च धडकणार असून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन देण्यात येणार आहे, तब्बल 190 किलोमीटरचा पायदळ प्रवास करत आदिवासी बांधव शेतकरी नागपुरात सहा दिवसानंतर दाखल होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande