वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर
* विदर्भ-मराठवाड्याचा अपमान नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - हिवाळी अधिवेशनात बुधवारी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबाबत सरकारला जाब विचारला. ''विदर्भात अधिवेशन होत असले तरी येथे आर्थिक विकासाचे प्रति
वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर


* विदर्भ-मराठवाड्याचा अपमान

नागपूर, 10 डिसेंबर (हिं.स.) - हिवाळी अधिवेशनात बुधवारी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाबाबत सरकारला जाब विचारला. 'विदर्भात अधिवेशन होत असले तरी येथे आर्थिक विकासाचे प्रतिबिंब दिसत नाही. गेल्या पाच वर्षांपासून आर्थिक विकास मंडळ अस्तित्वात नाही. यामुळे विदर्भ–मराठवाड्याच्या तरुणांवर अन्याय होत आहे', असे ते म्हणाले.

मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावर सरकारवर टीकास्त्र सोडले. 'वैधानिक विकास मंडळ बंद करून सरकार नवा अनुशेष निर्माण करत आहे. वैधानिक विकास महामंडळ सुरू करण्याबाबत १०० पेक्षा जास्त पत्रे आली आहेत, पण त्याचा विचारच होत नाही. येथे फक्त हुरडा खायला येतात, २०० कोटी रुपये खर्च होतात, पण प्रत्यक्षात काहीच निष्पन्न होत नाही, ही धुळफेक आहे', असा आरोप त्यांनी केला.

पुरवणी मागण्यांमध्ये वैधानिक विकास मंडळाचा प्रतिबिंब दिसत नाही. हा संविधानाचा अपमान आहे. वैधानिक विकास मंडळाचा ठरावा ताबडतोब केंद्राकडे पाठवा. मी सरकारकडे विचारणा केली पण पाठपुरावा होत नाही,” असेही ते म्हणाले.

तर संगीत दिग्दर्शनही करेल - नार्वेकर

यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 'आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू. प्रचलित पद्धतीने या मुद्द्यांना न्याय देऊ', असे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान नार्वेकर यांनी मुनगंटीवारांच्या विनोदी शैलीलाही प्रतिसाद दिला. मुनगंटीवार म्हणाले, 'काल आपण ‘एक दिन बिक जायेगा प्यारे तेरे बोल…’ हे गाणं म्हटलं, तसेच विदर्भाच्या कल्याणाचीही अंमलबजावणी व्हावी'. यावर नार्वेकर हसत म्हणाले, 'या प्रस्तावाला केंद्राची मान्यता मिळाली, तर गाण्यासह म्युझिक दिग्दर्शनही करीन.' विदर्भ–मराठवाड्यातील विकास प्रश्न पुन्हा एकदा अधिवेशनात अग्रस्थानी आला असून सरकारची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande