पैठणला महाविष्णुयाग यज्ञासाठी बसले १०८ दांपत्य
छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर (हिं.स.) पैठण येथील महाविष्णुयागाच्या यज्ञासाठी १०८ दांपत्यांच्या उपस्थितीत, नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दत्तगुरु पोहेकार यांनी शास्त्रोक्त मंत्रघोष केला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज कोल
पैठणला महाविष्णुयाग यज्ञासाठी बसले १०८ दांपत्य


छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर (हिं.स.) पैठण येथील महाविष्णुयागाच्या यज्ञासाठी १०८ दांपत्यांच्या उपस्थितीत, नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दत्तगुरु पोहेकार यांनी शास्त्रोक्त मंत्रघोष केला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर आणि गोरक्ष महाराज उदागे यांचे प्रवचन झाले. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन झाले. ध्वजकांडी सजवून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सोहळ्याला प्रारंभ झाला.

आयोजक नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्यासह शेकडो साधू-संतांनी उपस्थित राहून वातावरण भक्तिमय केले. नाथसंस्थानाधिपती वै. भैय्यासाहेब महाराज गोसावीनगरीतील नाथ समाधी मंदिराजवळ उभारलेल्या भव्य मंडपात हा धर्मसोहळा पार पडला.

दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. आठ दिवस सुरू राहणाऱ्या या ऐश्वर्यसंपन्न सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी असून दररोज पारायण, भक्त सोहळा, विविध संतांचे प्रवचन होत आहे. भाविक उपस्थित राहत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande