छ. संभाजीनगर - सोयगाव तालुक्यात बिबट्यांनी दोन बैलांचा घेतला जीव
छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून दोन बैलांना त्याने ठार केले आहे. दोन बैल मात्र बचावले आहेत. सोयगाव तालुक्यातील बहलखेडा या गावातील शेतात ही घटना घडली
छ. संभाजीनगर - सोयगाव तालुक्यात बिबट्यांनी दोन बैलांचा घेतला जीव


छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून दोन बैलांना त्याने ठार केले आहे. दोन बैल मात्र बचावले आहेत. सोयगाव तालुक्यातील बहलखेडा या गावातील शेतात ही घटना घडली यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा शिवारात नर-मादी बिबट्याच्या जोडप्याचा वावर शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. एका शेतात शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर चार बैलांचा पाठलाग करीत बिबट्यांच्या जोडप्याने देोन बैलांचा फडशा पाडला. तर पळून गेल्याने दोन बैल वाचले.

बहुलखेडा शिवारात शेतकरी किरणदास चव्हाण यांच्या शेतात चार बैल चारण्यासाठी सोडून ते तेथेच उभे होते. याच वेळी शेजारच्या झाडीत लपून बसलेल्या नर व मादी बिबट्यांनी या बैलांवर झेप घेतली. बैलांनी जीव वाचविण्यासाठी पळाले.तेव्हा या बिबट्यांनी त्यांचा पाठलाग करून दोन बैलांचा फडशा पाडला. तर दोन बैलांनी गावाकडे धूम ठोकल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोरच घडली. या घटनेची माहिती मिळताच वनपाल विजय कोळी, वनरक्षक शमीन तडवी, गणेश चौधरी, संतोष जाघव, नंद राठोड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande