
कागदोपत्रीच मोहीम राबवल्याबद्दल सीईओंनाच पुरस्कार द्या ! डॉ. गणेश ढवळे
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)। केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार 'जागतिक शौचालय दिना'पासून ते 'मानवी हक्क दिना 'पर्यंत म्हणजे १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हमारा शौचालय हमारा अभिमान ही विशेष मोहीम राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. जिल्ह्यातील १३५६ गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, रंगरंगोटी व नियमित बापर सुनिश्चित करण्यात यावी.
विद्यार्थ्यांची बिकट अवस्था
महाजनबाडी येथील लिबागणेश केंद्राखालील कोंबडं वस्ती जिल्हा परिषद शाळेतील शौचालय अनेक वर्षापासून बंद असून पूर्णपणे निकामी आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना शौचालयासाठी सहरांची परवानगी घेऊन घरी जावे लागते, अशी व्यथा विद्याच्यर्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली. अभियानाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १० डिसेंबरला 'उत्तम शौचालय पुरस्कार जाहीर होणार असल्याचे प्रशासन सांगत असताना अस्तित्वात नसलेल्या सुविधांची चमकदार कागदी नोंद मात्र व्यवस्थित तयार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis