धुळे - तंबाखूच्या विळख्यात बालके सुध्दा
धुळे , 10 डिसेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय डॉ. दत्ता देगावकर यांच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त भारत जनजागृती अभियान राबवताना कोटपा कायद्याविषयी मार्गदर्शन व या व्यसनाच्
तंबाखूच्या विळख्यात बालके


धुळे , 10 डिसेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय डॉ. दत्ता देगावकर यांच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्त भारत जनजागृती अभियान राबवताना कोटपा कायद्याविषयी मार्गदर्शन व या व्यसनाच्या भविष्यात उद्भवणाऱ्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यासाठी एन टि सी पी मार्फत डॉ. नितीन पाटील, डॉ. राहुल नेरकर, सटिन अपुले , जयश्री चौधरी, धनश्री बच्छाव यांनी यांनी विद्यावर्धिनी महाविद्यालयात हे अभियान कॉलेजचे प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.योगेश पाटील होते. तर मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक सटिन अपुले म्हणाले की वाढत्या तंबाखू सेवनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य धोक्यांवर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण अहवाल आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, तंबाखू व धूम्रपानातून निघणाऱ्या धुरामध्ये तब्बल 7,000 पेक्षा जास्त रसायने आढळतात. त्यापैकी 250 रसायने शरीरासाठी अत्यंत हानिकारक, तर 70 पेक्षा जास्त रसायने कर्करोगकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, निकोटीन, टार, कार्बन मोनोऑक्साइड, फॉर्मल्डिहाइड, बेंझीन, आर्सेनिक आणि सायनाइड यांसारखी विषारी द्रव्ये मानवी फुफ्फुसांचे कार्य , हृदयविकार, स्ट्रोक, तोंड व घशाचा कर्करोग, फुफ्फुसाचे आजार तसेच , असेही संशोधनात नमूद केले आहे. याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे, भारतातील १३ ते १५ वर्ष वयोगटातील तब्बल ८.५% बालक तंबाखूचे सेवन करतात, असा ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हेतील निष्कर्ष आरोग्य विभागाने जाहीर केला. किशोरवयात लागलेले निकोटीनचे व्यसन आयुष्यभर टिकू शकते आणि मेंदूच्या वाढीस गंभीर अडथळा निर्माण करतो, अशीही चेतावणी तज्ज्ञांनी दिली आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. योगेश पाटील म्हणाले की व्यसनमुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तंबाखूला नकार द्या निरोगी आरोग्याचा स्वीकार करा. यासाठी स्वतः बदलून समाज बदलण्याचा संकल्प जागवणे हे महत्त्वाचे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande