
रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांकरिता कामवाटप समितीची सभा येत्या १६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत १० लाख रुपयांच्या आतील कामांचे वाटप होणार आहे. या सभेमध्ये जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत), सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) यांच्या कामांचे वाटप होणार आहे. संबंधितांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन कामवाटप समितीचे सदस्य् सचिव तथा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी