निवडणूक प्रचारातील जाहिरातींमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा वापर तात्काळ बंदची मागणी
कोल्हापूर, 10 डिसेंबर (हिं.स.)। सध्या निवडणूक प्रचारादरम्यान विविध राजकीय गटांकडून प्रचार पाम्प्लेट, बॅनर, फलक, पत्रके इत्यादीमध्ये महापुरुष, संत, आदर्श व्यक्ती व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमा छापल्या जातात. हे साहित्य नंतर मोठ्या प्रमाणात रस्त्या
हिंदू जनसंघर्ष समिती, यांच्यावतीने जिल्हाधिकारी यानां निवेदन


कोल्हापूर, 10 डिसेंबर (हिं.स.)।

सध्या निवडणूक प्रचारादरम्यान विविध राजकीय गटांकडून प्रचार पाम्प्लेट, बॅनर, फलक, पत्रके इत्यादीमध्ये महापुरुष, संत, आदर्श व्यक्ती व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमा छापल्या जातात. हे साहित्य नंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, कचरा ढिगाऱ्यात, नाल्यात, डबक्यात किंवा इतर ठिकाणी फेकले जाते. ही परिस्थिती केवळ अनुचित, अनैतिक आणि अपमानास्पद नसून अनेकदा गंभीर सामाजिक तणावाला कारण ठरली असल्यामुळे प्रचारातील सर्व पाम्प्लेट, पोस्टर, बॅनर, फ्लेक्स इत्यादीवर महापुरुषांच्या प्रतिमांचा वापर तात्काळ बंद करावा. असे निवेदन “हिंदू जनसंघर्ष समिती, कोल्हापूर” यांच्यावतीने जिल्हाधिकारी यानां देण्यात आले

प्रचारातील सर्व पाम्प्लेट, पोस्टर, बॅनर, फ्लेक्स इत्यादीवर महापुरुषांच्या प्रतिमांचा वापर तात्काळ बंद करावा.

जर कोणत्याही व्यक्तीने किंवा पक्षाने असे साहित्य छापून वाटले तर छपाई करणारा, प्रकाशक उमेदवार यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. निवडणूक प्रचारासाठी वापरले जाणारे सर्व कागदी, प्लास्टिक किंवा इतर साहित्य छापण्यापूर्वी छपाई करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे अनिवार्यपणे जमा करण्याचे आदेश द्यावेत. नगरपालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून रस्त्यावर, नाल्यात, सार्वजनिक ठिकाणी फेकलेले प्रचार साहित्य तात्काळ गोळा करावे आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास बंदी तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचा अपमान केल्यास कठोर शासन-कारवाई करण्याची स्पष्ट अधिसूचना जारी करावी. अशा मागण्या करण्यात आल्या.

महापुरुषांचे चित्र म्हणजे राष्ट्राच्या प्रेरणेचा स्रोत असल्याने

हे चित्र कचऱ्यात, नाल्यात दिसणे म्हणजे संपूर्ण समाजाचा अपमान आहे. यामुळे भावना भडकतात, समुदायांमध्ये मतभेद वाढतात. राजकीय वादळ निर्माण होऊन शांतताभंगाची शक्यता वाढते.समाजातील सलोखा बिघडवणारी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.या करता, निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही प्रकारच्या साहित्यामध्ये महापुरुष, संत, राष्ट्रीय नेते किंवा आदर्श व्यक्तींच्या प्रतिमा वापरण्यास संपूर्ण मनाई करण्याचा आदेश तात्काळ जारी करावा. असे निवेदनात म्हंटले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर, गजानन गुरव यांना सदरचे निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अभिजीत पाटील, आनंदराव पवळ, कविराज कबुरे, महेश पोवार, स्वप्निल पोवार आदींचा समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande