छ.संभाजीनगरात दुचाकी चोरटे गजाआड; दुचाकीसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर (हिं.स.)। बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तिघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेली दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेली दुसरी दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्द
छ.संभाजीनगरात दुचाकी चोरटे गजाआड; दुचाकीसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त


छत्रपती संभाजीनगर, 10 डिसेंबर (हिं.स.)।

बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तिघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी गेलेली दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेली दुसरी दुचाकी असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

किरण सुखदेव गाडे (रा. ताहेरपूर ता. पैठण) बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोरून हिरो स्प्लेंडर

मोटरसायकल (एमएस २० एफझेड २०२८) चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तपासासाठी बिडकीन येथे आले असता, त्यांना गोपनीय माहिती मिळाली. तिघांनी मोटरसायकल चोरी केली असून ती विक्रीसाठी गंगापूरकडे नेत असल्याची माहिती मिळाली.

अंमलदार बलबिरसिंग बहुरे यांनी शासकीय वाहनातून युवराज बिअर बारजवळ सापळा रचला. तिघे इसम दोन मोटरसायकलवरून गंगापूरकडे जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून नाव विचारले असता त्यांनी आपली नावे सांगितली. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेने चोरी गेलेली मोटरसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली दुसरी मोटरसायकल असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी बिडकीन पोलिसांच्या ताब्यात दिले.

---------------

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande